तत्काळ मिळणार कन्फर्म सीट; रेल्वेने लाँच केले ‘Confirm Ticket’ अ‍ॅप

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवास करण्यासाठी कन्फर्म तिकीटसाठी किंवा तिकीट बुक करण्यासाठी खूप झंझट करावी लागते. मात्र आता तुम्हाला रेल्वे तिकिटासाठी काळजी करावी लागणार नाही.

तत्काळ तिकिटांसाठी रेल्वेने आता नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप फक्त आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर उपलब्ध असेल. या अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या आरामात लगेच तत्काळ तिकिटे बुक करू शकता.

बऱ्याचवेळा रेल्वेने अचानक प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येते. अशा स्थितीत रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होते. तसेच, तत्काळ तिकीट मिळणेही सोपे नसते. मात्र रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे सर्वसामान्य प्रवाशांची सोय होणार आहे. दरम्यान, IRCTC च्या प्रीमियम भागीदाराकडून ‘कन्फर्म तिकीट’ , या नावाने हे अ‍ॅप दाखवले आहे.

अॅपचे जबरदस्त फायदे 
– रेल्वेने लाँच केलेल्या या अ‍ॅपवर तुम्हाला ट्रेनसाठी तत्काळ कोट्यात उपलब्ध असलेल्या जागांचीही माहिती मिळेल.
– याशिवाय, वेगवेगळ्या ट्रेनचे नंबर टाकून तुम्ही रिकाम्या सीट सहज शोधू शकता.
– यासोबतच संबंधित मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमधील उर्वरित तत्काळ तिकिटांची माहिती तुम्हाला घरबसल्या आरामात या अॅपवर मिळेल.
– हे अ‍ॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
– या अ‍ॅपमध्ये तिकीट बुकिंगसाठी मास्टर लिस्ट देखील आहे, जेणेकरून तिकीट बुकिंगसाठी तुमचा वेळ वाया जाणार नाही.

यावेळी करा तिकीट बुक
– या अ‍ॅपवर, प्रवासी त्यांच्या सेव्ह डेटाद्वारे सकाळी 10 वाजल्यापासून तत्काळ तिकीट बुक करू शकतात.
– यानंतर, येथे तुम्ही या तिकिटाचे ऑनलाइन पेमेंट करू शकाल.
– लक्षात ठेवा तिकीट काढल्यानंतरही तिकीट वेटिंगमध्ये असू शकते.
– या अ‍ॅपचे नाव कन्फर्म तिकीट आहे.
– तुम्ही हे अ‍ॅप IRCTC नेक्स्ट जनरेशन मोबाइल अ‍ॅपवरूनही डाउनलोड करू शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.