जेवणात चिकन मिळाले नाही म्हणून पित्याने घेतला मुलीचा जीव

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

विद्येचं माहेर अशी खरी पुण्याची ओळख आहे. पुण्याचे आणि पुणेकरांचे किस्से जगभर प्रसिद्ध आहेच पण सध्या एक भयानक गोष्ट समोर येत आहे. पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस खूप वाढ होत चालली आहे. त्यातच आता पुण्याच्या पाषाण परिसरातून एक थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे.

जेवणात चिकन मिळालं नाही याचा राग अनावर झाल्याने एका इसमाने भयानक कृत्य केले. रागाच्या भरत त्याने त्याच्याच पोटच्या लेकीवर हल्ला केला. त्याने चिमूल्य मुलीच्या डोक्यात थेट वित्त मारून तिला गंभीर जखमी केले. पुण्याच्या पाषाण येथील वाकेश्वर येथे ही भयानक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याविरोधात चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र घडलेल्या भीषण प्रकारामुळे ती अद्यापही भेदरलेल्या अवस्थेत आहे.

बायकोचा राग मुलीवर
विकास नागनाथ राठोड असे आरोपीचे नाव असून, तो वाकेश्वर रॉस येथे पत्नी आणि आपल्या मुलीसह वास्तव्यास आहे. आरोपी विकास राठोड याने सोमवारी रात्री पत्नीकडे जेवण मागितले. तटणीने त्याला जेवायला वाढले. मात्र जेवणात चिकन नसल्याने आरोपीस प्रचंड राग आला. संतापाच्या भारत त्याने पुढचा मागचा हवीच विचार न करता तिथेच पडलेली एक वित्त उचलली आणि त्याच्या लहान मुलीच्या डोक्यात मारली. यामध्ये ती चिमुकली गंभीर जखमी झाली. याप्रकरणी आरोपी विकासचे सासरे रघुनाथ लालु पवार (रा. पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत जावयाविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यांनतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकारांचा पुढील तपास सुरु आहे. पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दिवेदेनदिवस वाढ होत असून, या घटनेमुले मोठी खळबळ माजली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.