आश्रम शाळा चारठाणा येथील गैरप्रकार व शासनाची फसवणूक बाबतची बातमी निरर्थक व खोटी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

संदीप हरी पाटील मुख्याध्यापक हे माध्यमिक आश्रम शाळा चारठाणा येथे कार्यरत असून 2004 पासून आज पर्यंत शासन नियमानुसार व धोरणानुसार आपला कार्यभार सुरळीतपणे सांभाळत असून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार व इतर पुरस्कार मिळालेले आहेत व हे सर्व पुरस्कार त्या त्या निवड समितीतर्फे सर्व्हे करून देण्यात आलेले आहे.

विद्यार्थ्यांशी व गावकऱ्यांशी चर्चा केली असता, सदर मुख्याध्यापक हे शाळेत नियमित हजर राहत असून शालेय व्यवस्थापन उत्तमपणे सांभाळत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी सांगितले आहे. तसेच संबंधित व्यक्ती ही मुख्याध्यापक, सचिव व अध्यक्ष यांच्याबाबत वरिष्ठांकडे नेहमी खोट्या तक्रारी करत असत.

नवीन नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदरची संस्थेने केलेल्या नेमणूक ही शासनाच्या ध्येय धोरणानुसार व नियमानुसार केलेली आहे व त्यास शासन मान्यता सुद्धा मिळालेली आहे. ज्ञानेश्वर रामदास चव्हाण यांच्याबाबतीत दिलेले वृत्त निरर्थक असून ज्ञानेश्वर चव्हाण यांना संस्थेने जून 2015 पासून सेवेत सामावून घेतलेले असून, त्यांचे जून 2015 पासून चे थकीत वेतन सुद्धा शासनाकडून अदा करण्यात आलेले आहेत. पोलीस तक्रारीबाबत दिलेली वृत्त निरर्थक असून त्याबाबत कुठलेही बोलावणे आले नाही. यावरुन सदर संबंधित व्यक्तीने दिलेली बातमीतील माहिती खोटी असून सदर बातमी निरर्थक आहे तरी संपादक महोदय यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा

Leave A Reply

Your email address will not be published.