चाळीसगाव पोलिसांनी आवळल्या चोरट्याच्या मुसक्या, ४ दुचाकी जप्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोराला पकडण्यात यश आले आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटारसायकल चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी एका संशंयिताला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याकडे आणखी तीन मोटरसायकल पोलिसांना चोरीच्या मिळून आल्या.

पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ दुचाकी चोरीला गेली होती. त्याची तक्रार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात आलेली होती. या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर या चोरीचा पदार्फाश झालाय.

९ दुचाकींसह चोरी करणारी टोळी ताब्यात
धुळे शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याचा शोध पोलिसांकडून सुरु होता. या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या ३ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या गुरुद्वारा परिसरामध्ये पुलाखाली काही संशयित चोरटे काही दुचाकीसह उभे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास मिळाली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.