चाळीसगाव जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षीय सहविचार सभा

0

चाळीसगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव जिल्हा व्हावा ही अनेक वर्षांपासून मागणी सुरु आहे परंतु राज्यात नविन २२ जिल्हे निर्माण होणार आहेत या पार्श्वभूमीवर परत एकदा चाळीसगावही जिल्हा व्हावा या मागणीसाठी चाळीसगाव जिल्हा निर्माण संघर्ष समितीने दि १३ मे २०२३ रोजी अरीहंत मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सहविचार सभेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला चाळीसगाव जिल्हा व्हावा हा सकारात्मक सुर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आळवला,

या सभेत सर्वप्रथम प्रास्ताविकातुन अजिज खाटिक यांनी जिल्हा निर्मितीची संकल्पना व स्वरूप स्पष्ट केले तसेच रामलाल चौधरी यांनी मनोगतात जिल्हा निर्मितीचे फायदे सविस्तर विशद केले तसेच माजी आमदार ईश्वर जाधव यांनी समितीला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले,प्रमोद पाटील यांनी तालुक्यात प्रांत व पोलिस अधिकारी व इतर सर्व कार्यालय असल्याने आपला पाया मजबूत आहे असे सांगितले,अनिल निकम यांनी विशद केले की सर्व पायाभूत सुविधा आहेत त्यामुळे चाळीसगाव जिल्हा होणे सुकर आहे तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी एकसंघ होण्याचे आवाहन केले,शशिकांत साळुंखे यांनी आपली सर्वांची जिल्हा होण्यासाठी एक मानसिकता असून शासनाची मानसिकता असेल तर जिल्हा होण्यास काही एक अडचण नाही असे नमूद केले तसेच दिनेश पाटील यांनी चाळीसगाव जिल्हा होणे ही अभिमानाची बाब आहे यासाठी इतर तालुक्यांनी चाळीसगावात समाविष्ट व्हावे असे आवाहन केले,सुधाकर मोरे यांनी जिल्हा होण्यासाठी राजकिय इच्छाशक्ती लागते असे सांगितले,दिनेश बोरसे यांनी जिल्हा होणे राजकीय फायद्यासाठी महत्त्वाचे आहे व त्यासाठी सर्वांनी सामुदायिक सहभाग घ्यावा असे आवाहन केले,प्रतिभा पवार यांनी चाळीसगाव जिल्हा निर्माण झाल्यास सर्व जनतेसाठी ते कसे फायदेशीर असेल असे सांगितले,प्रदिप देशमुख यांनी चाळीसगावची भौगोलिक परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी व हे सर्वपक्षीय नेत्यांना पटवून द्यावे अशी सूचना मांडली,सोनाली लोखंडे यांनी सर्वांनी एकसंघ कार्य करावे असे सांगितले तसेच अॕड.निवृत्ती पाटील यांनी संघर्ष समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या,सविता राजपूत यांनी आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेने काम करावे असे सांगत चाळीसगाव जिल्हा झाल्यावर सर्वात जास्त फायदा महिलांचाच होईल असे विशद केले,

दिव्यांग असलेले निळकंठ साबणे यांनी संघर्ष समितीच्या कार्याला यश मिळेल असे सांगत दिव्यागांनाही चाळीसगाव जिल्हा झाला तर खूप फायद्याचे होईल असे नमूद केले,वसंतराव चंद्रात्रे यांनी आपण सर्व जिल्हा निर्मितीसाठी भावनात्मक दृष्टीने जवळ आलो आहोत म्हणून सक्रिय होणे काळाची गरज असून विविध संस्थांचे ठराव एकत्र करण्यासाठी सूचित केले,या सहविचार सभेत ८९ वर्षांच्या वयोवृद्ध पासून ते ९ वर्षांचा बालकाचा सहभाग होता. या सहविचार सभेस आर्किटेक्ट धनंजय चव्हाण,अविनाश चौधरी,देवेंद्र पाटील,सतिश महाजन,महेश चव्हाण,सी.सी.वाणी,अरुण पाटील,संजिव पाटील,राजेंद्र गवळी,मिलिंद देवकर,आर.डी.चौधरी,राकेश बोरसे,रविंद्र जाधव,किरण आढाव,एम.बी.पाटील,मंगेश शर्मा,राकेश राखुंडे,तमाल देशमुख, किशोर जाधव,गोकुळ पाटील, पी एन पाटील,प्रमोद वाघ,छोटु अहिरे,विलास चव्हाण,सागर निकम व भिमराव खलाणे,प्रविण वाबळे,अॕड.राहुल जाधव,उदय पवार,सुनिल चव्हाण,राहुल मोरे,नारायण परदेशी,योगेश मोरे,देवेंद्र पाटील,हेमचंद्र चौधरी, प्रशांत गायकवाड,अनिल ठाकरे,श्रीकांत राजपूत,महेंद्र महाले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भोसले यांनी तर आभारप्रदर्शन गणेश पवार यांनी केले,सदरील सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी चाळीसगाव जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे निमंत्रक यांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.