Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चाकूचा धाक दाखवत महिलेकडून लुटले पैसे
    गुन्हे वार्ता

    चाकूचा धाक दाखवत महिलेकडून लुटले पैसे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 7, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    रात्रीच्या वेळी राहत्या घरी जबरदस्ती शिरून महिलेचा चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार सोमवारी (दि.४) मध्यरात्री १ च्या सुमारास घडला आहे. चोरीनंतर दरोडेखोरांनी महिलेला घरातच डांबून ठेऊन पोबारा केला. माणगाव तालुक्यातील इंदापूरजवळील मौजे कलानगरमध्ये हा प्रकार घडला. चोरीनंतर दरोडेखोरांनी महिलेला घरातच डांबून ठेवून पोबारा केला. माणगाव तालुक्यातील इंदापूरजवळील मौजे कलानगरमध्ये हा प्रकार घडला असून, या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    या घटनेची फिर्याद अंकिता अरुण मांगले (वय ३०) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. सोमवारी रात्री फिर्याद अंकिता मांगले जेवण करून आपल्या घरी झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री १ च्या सुमारास दोघांनी आतून कडी लावलेला दरवाजा जबरदस्तीने ढकलून उघडला. दोन्ही चोरांनी तोंड पूर्णपणे बांधले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवता आली नाही. एका चोराने अंकिता यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच तोंड दाबून ‘तू चूप बैठ’ असे बोलून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी दुसऱ्या चोराने कपाटाचे कुलूप तोडून त्यातील तीन लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने काढून घेतले. त्यानंतर दोघांनीही अंकिता यांना घरात डांबून तेथून पोबारा केला.

    घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश अस्वार पुढील तपास करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif