लोकशाही’ निर्मित मतदार जागृती गीताचे प्रसारण

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार

0

जळगाव : ‘लोकशाही’ माध्यम समूहातर्फे निर्मित ‘चला, चला मतदान करु चला!’ या मतदार जनजागृतीपर गीताचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून औपचारिक प्रसारण करण्यात आले. तर यासंदर्भातील पोस्टरचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गीतकार मनोहर आंधळे,
संगीतकार आप्पा नेवे, गायिका तथा नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, निर्मिती सहाय्यक प्रांताधिकारी प्रमोद हिले, मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, निर्माता तथा लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर, डॉ. अमोडकर, शुभदा नेवे उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यावेळी कललावंतांचा सत्कार करण्यात आला. तर लोकशाही माध्यम समूहातर्फे आयुष प्रसाद व जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचा सन्मान करण्यात आला. हे गीत निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया हँडलवर असून संपूर्ण महाराष्ट्रात या गीताचा डंका वाजत आहे.
जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या पत्नी, प्रख्यात उद्योगपती अशोक जैन, फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव, आय.एम.ए सचिव डॉ. अनिता भोळे, डॉ. विलास भोळे, तहसीलदार शितल राजपूत, ज्येष्ठ संपादिका शांता वाणी, कमलाकर वाणी, कविता ठाकरे, डॉ. प्रमोद अमोडकर, शुभांगी यावलकर, तृतीयपंथी बेबो, दिव्यांग विमल कोळी, विवेक कुलकर्णी, सुभाष गोळेसर तसेच नशिराबाद गावातील नागरिकांनी भूमिका साकारल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.