Breaking :12 मेपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वेगाड्या धावणार

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभाग 12 मेपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वेगाड्या सुरु करणार आहे. तसंच उद्या संध्याकाळपासून या रेल्वे सेवांचं तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे  विभागाच्या या निर्णयामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुरुवातीला 12 मे रोजी 15 गाड्या (30 फेऱ्या) सुरु होतील. यात नवी दिल्ली (दिबरुगड), आगरताळा, हावरा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवी यांचा यात समावेश असेल.

उद्यापासून तिकीट आरक्षण

१२ मे पासून रेल्वे मर्यादित स्थानकांवर रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार असून त्याची तिकीट विक्री उद्यापासून (सोमवार) करण्यात येणार आहे. प्रवशांना संध्याकाळी ४ वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन तिकिटांचं आरक्षण करता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.