फटाका कारखान्यात एकामागे एक भयंकर स्फोट

वटपौर्णिमेमुळे महिला सुटीवर असल्याने जीवित हानी टळली : आवाजाने परिसर हादरला

0

 

सोलापूर | लोकशाही न्यूज नेटवर्क

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या फटाका कारखान्यात एकामागे एक झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसर हादरला आहे. या कारखान्यात सुमारे  १५ महिला मजूर काम करतात. मात्र सुदैवाने आज वटपोर्णिमा असल्यामुळे अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. वटपोर्णिमेमुळे या सर्व महिलांनी सुटी घेतली होती. त्या महिला कारखान्यात असत्या तर भीषण प्रसंग ओढावला असता.

 

स्पोट इतका भयंकर की… 

बार्शी तालुक्यातील घारी गावात असलेल्या फटाका कारखान्यात ही घटना आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे. या कारखान्याला शुक्रवारी अचानक आग लागली. त्यानंतर कारखान्यातून स्फोटांचे मोठमोठे आवाज परिसरात ऐकू येऊ लागले. धुरांचे लोट परिसरात लांबच्या लांब दिसत होते. हा स्फोट इतक भीषण होता की, आजूबाजूतील परिसराला हादरा बसला. स्फोट झालेल्या त्या फटाका कारखान्यात जवळपास १५  महिला मजूर काम करतात. परंतु शुक्रवारी वटपौर्णिमा होती. त्यामुळे पुजेसाठी या महिलांनी सुट्टी घेतली होती. कोणतीही महिला कामाला गेली नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग कशामुळे लागली, ते अजून समोर आले नाही.

 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान, पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. ते पुढील कारवाई करीत आहेत. फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात सुदैवाने कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झाली नाही. मात्र, कारखाना मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ४० लाखांचे फटाके जळून भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती पांगरी पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.