फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जण ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. यात 6 महिलांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 महिला होरपळल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर तिथं अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. यात काही महिला गंभीररित्या होरपळल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

हिमाचल प्रदेशातील उना इथल्या टाहलीवालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. यामध्ये कारखान्यात काम करणाऱ्या महिलांचा होरपळून मृत्यू झाला. स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात आली असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जवळपास 12 महिला जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. कारखान्यात 30 ते 35 लोक काम करत होते.

सध्या अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका जोरदार होता की, जवळच्या कारखान्यांच्या काचा फुटल्या. मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. बाथू इंडस्ट्रियल एरियातील एका कारखान्यात हा अपघात झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.