मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार थेट राज ठाकरेंच्या भेटीला

0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – मनसे युतीचे संकेत मिळू लागले आहेत. सत्तेतून असून देखील बंडखोरी केलेले शिवसेना आमदार आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आहेत.
यामुळे आता सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. आज सकाळी शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र भेटीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
राजकीय वर्तुळात मनसे – शिवसेना हे कट्टर विरोधक आहेत. मात्र असं असलं तरी देखील आता शिवसेना आमदाराने थेट राजसाहेबांची भेट घेतल्याने अनेकांच्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे काही राजकीय समीकरण बदलणार का? आता हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
याचबरोबर दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींवर राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं. शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे तब्बल 40 आमदार सामील झाले होते. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलं अन् कोसळलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केलं.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकारला. तर उपमुख्यमंत्री पदाचा कारभार देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला. विशेष बाब म्हणजे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत मनसेच्या एकमेव आमदारानं देखील विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं.
यामुळे मनसे आणि भाजपाची जवळीक पाहायला मिळत आहे. आगामी पालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याचबरोबर सरवणकर हे पक्षावर काही दिवसांपासून नाराज असल्याच देखील बोललं जातं आहे.
सदा सरवणकर यांचं तिकीट कापून शिवसेनेनं आदेश बांदेकर यांना दिल्यानंही सरवणकर नाराज होते. पण २०१९ च्या निवडणुकीत संधी मिळून आमदार झालेले सरवणकर सध्या शिंदे गटात सामील झाले आहेत. आता त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. लवकरच भेटी मागचे कारण देखील समोर येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.