मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना भडगाव तालुका व शहर तर्फे आज सकाळी 11 वाजता भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात रुग्णांना विविध प्रकारचे फळ वाटप करण्यात आले. या वेळी तालुकाप्रमुख संजय (भुराआप्पा) पाटील व शहरप्रमुख अजय (आबा)चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल नेतकर, अतुल पाटील, प्रदीप महाजन, बापू पाटील, जग्गु भोई, संतोष महाजन, विनोद भोई ,मोहन पाटील ,ईनुस खान, महेंद्र ततार, मयुर महाजन, पुरुषोत्तम सपके आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.