भडगाव नगरपालिकेतर्फे प्लास्टिक बंदी मोहीम सुरू

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव शहरात सिंगल युस प्लास्टिक बंद व जप्ती मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषद कार्यालय, बाजार चौक, नगरदेवळा दरवाजा, दत्ता पवार शॉपिंग, व्यंकटेश प्लाझा, तहसील कार्यालय, बस स्थानक येथील सर्व हातगाडी धारक, किराणा दुकानदारांना सिंगल युज प्लास्टिक वापरू नये याबाबत नोटीस व सूचना दिल्या. तसेच बंदी असलेले प्लास्टिक जमा करण्यात आले. यापुढे बंदी असलेले प्लास्टिक वापर करू नये या बाबत सूचना नगरपालिका यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

ही मोहीम मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम राबविण्यात आली. सदर पथकात गणेश मोहन लाड, आरोग्य अभियंता, तुषार मधुकर नकवाल, स्वच्छता निरीक्षक, छोटू वैद्य न.पा.आरोग्य विभाग लिपिक, शहर समन्वयक स्वप्नील सोलंके, जोसेफ मरसाले सफाई मुकादम , सफाई कर्मचारी यांची सदर मोहिमेत भाग घेवून भाजीपाला दुकानदार यांच्याकडून 5 किलो प्लास्टिक जमा केले.

याबाबत भडगाव नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी प्लास्टिक पिशव्या वापरू नये, या जागी कापडी पिशव्या वापराव्या असे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.