माजी सैनिक व आरोग्य सेवक राजू गायकवाड सेवानिवृत्त

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव येथील शासकीय आरोग्य विभागातील आरोग्य सेवक राजु रंगनाथ गायकवाड उर्फ सनी बॉस हे दि. ३१ जानेवारी राेजी सेवा निवृत्त झाले. त्यांनी आरोग्य विभागात १६ वर्ष प्रामाणिक सेवा देत शिरगाव जि. सिंधूदुर्ग व गिरड ता. भडगाव येथे सेवा केली आहे. तसेच या अगाेदर त्यांनी आर्मी मध्ये १८ वर्ष सेवा केलेली आहे. सर्वांशी मनमिळाऊ व अजात शत्रु म्हणुन त्यांची परिसरातुन ओळख आहे.

माजी सैनिक फाऊंडेशन भडगावच्या वतीने अध्यक्ष प्रमाेद पाटील, उपाध्यक्ष देविदास पाटील, सचिव भिमराव माळी, विजय पाटील, शांताराम आप्पा भाेई, सुनिल पाटील, दगडु पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, दिपक पाटील, चिंतामन पाटील, निंबा बडगुजर, परमेश्वर तावडे, संजय पाटील, कृष्णा पाटील आदी माजी सैनिकांनी त्यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.