साधन केंद्र भडगाव उर्दू येथून केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत समूह साधन केंद्र भडगाव उर्दू येथून केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन दिनांक 26, 27 व 28 डिसेंबरला अँग्लो उर्दू शाळा भडगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

दि. 26 डिसेंबर सोमवार रोजी सकाळी 9 वाजता तहसिलदार मुकेश हिवाळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी रमेश वाघ उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, मुख्याधिकारी रवींद्र लाडें, कजगाव लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, सचिन परदेशी, आर. टी. सैंदाणे, गणेश पाटील, हाजी महेमूद अहमद इसा खान, सय्यद इमरान अली (जिल्हाप्रमुख अल्पसंख्यांक सेना भडगाव), डॉ. मिर्झा वसीम बेग, शेख अल्ताफ शेख उमर, पठाण मुजाहिद खान ऐतबार खान, शेख नाजिम शेख मेहमूद, मिर्झा युनूस बेग याकुब बेग, शेख खालील शेख अजीज, शेख सलीम शेख अकबर, अनवर शेख गफूर तांबोली, शेख मुस्ताक शेख बाबू पटेल, लियाकत अली चांद अली सय्यद, इस्माईल गुलाब पिंजारी, शेख रफिक चिरागोदिन, कदिर खान जोरावर खान, अमानुललाह खान अहमद खान, हाजी मुनसफ खान इसा खान, खान करिमा मुसा खान, उर्दू केंद्राचे शेख आरिफ शेख कादर, शेख रफिक शेख मुसा व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू उपस्थित होते.

सदर क्रिडा स्पर्धेत तीन ग्रुप तयार करण्यात आले होते. ग्रुप 1 मधून इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रनिंग, म्युझिक चेअर, लिंबू चमचा रेस, तालीमार व लंगडी या खेळाचे समावेश करण्यात आले होते. ग्रुप 2 मधून इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रनिंग, म्युझिक चेअर, लॉन्ग जम्प, खो-खो, डॉज बॉल व कबड्डी या खेळाचे समावेश करण्यात आले होते. तसेच ग्रुप 3 मधून इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रनिंग, लॉंग जम्प, म्युझिक चेअर, खो खो, कबड्डी अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता. या क्रीडा स्पर्धेतून भडगाव तालुक्यातील एकूण 12 उर्दू शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्हाज महेमूद अहमद इसा खान (केंद्र प्रमुख भडगाव उर्दू) यांचे अध्यक्षतेखाली नियोजन समिती, आर्थिक समिती, साहित्य खरेदी समिती, मैदान तयार करणारी समिती, अंपायर समिती, सपोर्टर, लेखी कार्य समिती, तयार करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.