एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयांतर्गत पोषण अभियान

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयांतर्गत पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पोषण अभियानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कुपोषणा विषयी व आभा कार्ड विषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा कार्यक्रमाधिकारी राऊत यांनी पौष्टिक आहार विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास DHO सचिन बाहेकर व BDO रमेश वाघ, तहसीलदार हिवाळे, नगरपालिका सीओ लांडगे , आरोग्य अधिकारी डॉक्टर समाधान वाघ उपस्थित होते. तसेच सीडीपीओ सावंत मॅडम यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली व सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरला परदेशी, सुप्रिया सूर्यवंशी, सरिता शेजवळ, तसेच एस बी खामकर, सुदर्शन पाटील (संरक्षण अधिकारी), प्रशांत कुंभारे यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जाधव यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.