गोंडगाव येथील घटनेबाबत वाक ग्रामस्थांकडून कँडेल मार्च

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील गोंडगांव येथे आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करत बलिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. या बाबत तालुक्यातील वाक ग्रामस्थांनी काल सायंकाळी गावात कँडल मार्च काढत घटनेचा निषेध करत आठ वर्षीय बालिकेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वाक गावातील सर्व ग्रामस्थ महीला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.