भडगाव ते नाचणखेडा रस्ता तात्काळ करावा व शहरातील शिवनेरी गेट नगरदेवळा गेटचा प्रश्न मार्गी लावा

युवा शेतकऱ्यांचे आ.किशोर पाटील यांना निवेदन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील शेतकरी व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणारे शिवनेरी गेट ची आहे. त्या नावासहित उंची वाढवावी व भडगाव ते नाचनखेडा हा दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता तत्काळ करावा. या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात युवा शेतकरी बांधवांनी आमदार किशोर पाटील यांना निवेदन दिले. त्याची तत्काळ दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी दोन्ही कामे तत्काळ मार्गी लावु असे म्हणत, प्रशनालाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

यावेळी जय बजरंग ‘भोईवाड्याचाराजा’ मित्र मंडळाचे नरेंद्र पाटील, महेंद्र भोई, भुषण पाटील, आकाश भोई, प्रवीण भोई, सचिन भोई, मोहित भोई, सुरज परदेशी, सागर भोई आकाश कुंभार, शाम पगारे, ,रोहित भोई, यश पाटील, निखिल भोई, राहुल भोई, पिंटू पाटील, बंटी पाटील, जयेश पाटील, संदीप वाघ, अरुण मोरे, समाधान अहिरे, राहुल पवार, रवींद्र भोई, नितीन भोई, चेतन भोई, गोलू भोई आदी उपस्थीत होते.

चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग झाल्याने येथील शिवनेरी गेट ची उंची कमी झाली आहे. त्याने यशवंत नगर भागात जाणारे मोठी वाहन, शेतकऱ्यांचे उत्पादनाचे वाहन, सण उत्सवाच्या मिरवणूका नेण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेट च्या कमाणीचा समोरिल काही भाग हा जीर्ण झाला असून वाहन लागुन खाली पडत आहे. राष्ट्रिय महामार्ग झाल्यापासून या भागात मोठी वाहन गेटमधून निघत नसल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठा त्रास व समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील शिवनेरी गेटची आहे. त्या नावासहित उंची वाढवून सुशोभीकरण करून देण्यात यावे.

या मागणीसह भडगाव ते नाचनखेडा हा दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता ही गेल्या अनेक दिवसापासून नाहीसा झाला आहे. रस्त्यावरून येण्या-जाण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात शेतकरी विद्यार्थ्यांना येथून जाणे बंद करावे लागते. वाहतूक दळणवळण थांबते. म्हणून हा रस्ता तात्काळ व्हावा या आशयाचे निवेदन ही युवकानी आमदार पाटील यांना दिले. गेट व रस्त्याचे दोन्ही प्रश्न लवकर मार्गि लागणार असल्याने युवकांनीं समाधन व्यक्त केले. यासोबत मेन रोड नगरदेवळा दरवाजा गेटचा ही विषय मार्गी लागणार आहे.

निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, तहसीलदार मुकेश हिवाळे, भडगाव पोलिस स्टेशन आदींना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.