महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे संभाजी भिडेंचा महिला दक्षता समितीने केला जाहीर निषेध

0

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहनरॉय, पंडित जवाहरलाल नेहरू, भारतीय संविधान व असंख्य भविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल संभाजी भिड़े गेल्या काही दिवसांपासून आक्षेपार्ह अवमानजनक वादग्रस्त विधाने करीत आहेत. सदर वक्तव्यांमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय तेढ़ निर्माण होत आहे. याबाबत शासनाने दख़ल घ्यावी. गुन्हा दख़ल करून सदर व्यक्तिस अटक व्हावी व कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून अशाप्रकारे सामजिक वातावरण दूषित करणारे, धार्मिक भावना दुखावणारे तसेच भारतीय एकता, अखंडता, सर्वधर्म समभावास व संविधाचा अवमान करणाऱ्या वृत्तीला आळा बसेल यासाठी तात्काळ कारवाही व्हावी अशा आशयाचे निषेध निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना भडगांव पो. स्टे. दक्षता अध्यक्षा मा. नगरसेविका योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या चंदा पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरुपात दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.