gifts for disney movie lovers craftsvilla coupon code october 2015 future shop coupon code my little pony gift set review intune guitar picks coupon musicians friend 20 percent off coupon
Friday, December 2, 2022

विद्यार्थिनींनी बनविले आकाश कंदील व आकर्षक पणत्या

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दीपावली सणाचे औचित्य साधून कार्यानुभव व चित्रकला विषय अंतर्गत विद्यार्थिनींनी सुंदर आकाश कंदील व आकर्षक पणत्या बनविले.

- Advertisement -

अर्चना बच्छाव, वृषाली निकुंभ, अनिता जाधव, पूनम सोनवणे, सर्व कार्यानुभव, चित्रकला शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी सुंदर आकाश कंदील व विविध पणत्यांच्या नमुन्यांचे प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थिनींनी समोर सादर केले.

- Advertisement -

पर्यावरण संवर्धनासाठी मातीच्या पणत्या व घोटीव कागदाचे कंदील निर्मिती करून चायना वस्तूला पर्याय उपलब्ध करून दिला. स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांनी आपल्या आविष्कारातून छान पद्धतीने आकर्षक रंगसंगतीतून आकाश कंदील व पणत्या बनवल्या.

सहभागी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक सुरेश रोकडे, पर्यवेक्षक जी. टी. माळी, संस्थाध्यक्ष एकनाथ महाजन, मानद सचिव दीपक महाजन, उपाध्यक्ष विजय महाजन, भिकनराव महाजन, विनोद महाजन, संचालक मंडळ यांनी विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या