प्रेमात अडसर ! मामाच्याच मुलीची केली हत्या

0

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क

बीडच्या (Beed) धारूर तालुक्यातील कासारी गावात (Kasari Village) खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाच्या मुलीला प्रियकराच्या मदतीने विहीरीत ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. साक्षी ज्ञानोबा कदम (वय 16) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय ?

कासारी गावात यात्रेसाठी परळी तालुक्यातील पाडोळी येथील वैष्णवी मनोहर काळे ही तिचे मामा ज्ञानोबा कदम यांच्या गावाकडे आली होती. ती मामाच्या गावाला गेल्याचे कळताच तिचा गावातील प्रियकर आकाश नागोराव तांबडे हा स्कॉर्पिओने कासारी गावात आला होता. वैष्णवी ही तिचे मामा ज्ञानोबा सोपान कदम यांच्याकडे यात्रेनंतरही थांबली होती.

वैष्णवीचा प्रियकर स्कॉर्पिओ घेऊन आला. वैष्णवी आणि तिच्या प्रियकराला गावातून पळून जायचे होते. परंतु त्यांच्याबरोबर साक्षी असल्याने ती दोघांचे प्रेमप्रकरण नातेवाइकांना सांगेल या भीतीने दोघांनी दुपारी साक्षीला विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. परंतु साक्षी विरोध करत होती. शेवटी दोघांनी जोराचा धक्का देऊन विहिरीत ढकलून दिले. यानंतर वैष्णवी व तिचा प्रियकर आकाश हा स्कॉर्पिओने गावातून पसार झाले.

दरम्यान याप्रकरणी दोघांवर विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.