संतापजनक ! आश्रम शाळेत 5 मुलींवर अत्याचार

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातून संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी या आश्रमात राहणाऱ्या एका मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान 5 मुलींवर अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

15 मुलींचे जबाब नोंदवले

या आश्रमाचा संस्थाचालक संशयित हर्षल मोरे याने सहा मुलींवर अत्याचार केल्याचं उघडकीस आले आहे. आधार आश्रमात शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीवर आश्रमाच्या संस्थाचालक संशयित आरोपी हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली. पीडित 6 मुलींपैकी 5 मुली अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 15 मुलींचे जबाब नोंदवले आहेत. त्यात ही धक्कादायक माहिती उघड झाली.

गरिबीचा घेतला फायदा

नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील द किंग फाउंडेशन संचलित आधार आश्रमात शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीवर आधार आश्रमाच्याच संचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात असलेल्या या अनाथ आश्रमात गोरगरीब आणि बेघर मुलं आणि मुली निवासी म्हणून वास्तव्य करताय. मात्र याच गरिबीचा फायदा घेत या संस्थेच्या संचालकाने या संस्थेत वास्तव्यास असलेल्या एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान या मुलीने आश्रमातून पळ काढून तिच्या नातेवाईकांना ही घटना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोस्को बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मुलीचा आश्रमातून पळ

ऑक्टोबर महिन्यात या नराधम संचालकाने पीडित मुलीला पाय दाबण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने पुन्हा नोव्हेंबर महिन्यात या मुलीला त्याच्या खोलीत बोलावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या मुलीने या आश्रमातून पळ काढलं आणि हा घडलेला सर्व तिने नातेवाईकांना सांगितला. तेव्हा हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

Leave A Reply

Your email address will not be published.