विविध मागण्यांबाबत रोजंदारी कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बैठक

0

जळगांव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगांव येथे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बैठक जळगांव येथे भारतीय कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली झाली असून या बैठकीत रोजदारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ठराव देखील मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय कामगार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष जहांगीर खान , जिल्हाध्यक्ष, चेतन नन्नवरे, व्ही. जे. एन.टी. महामंडळ विभागाचे अध्यक्ष, राहूल बिन्हाडे, अर्जुन मोरे, मोहन बिन्हाडे, कपील जाधव, शेनपडू सोनवणे, दिपक सोनवणे, विमलताई मोरे आदी उपस्थित होते.

यात त्यांनी म्हटले आहे कि, राज्यातील १५ ते २० वर्षापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे तसेच इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे अप्पर मुख्य सचिव व व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांना लेखी निवेदनाव्दारे भारतीय कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांनी केली आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ हे दिनांक ८ फेब्रुवारी १९८४ रोजी स्थापन करण्यात आलेले असून हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे.

कंपनी अधिनियम १९५६ च्या कलम ६१७ व्या व्याख्यानुसार महामंडळ ही सरकारी कंपनी आहे. या महामंडळात वर्ग-३ व वर्ग-४ या पदावर गेल्या १५ ते २० वर्षापासून रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. सदरचे रोजंदारी कर्मचारी हे खंड न देता नियमितपणे कार्यरत असून प्रामाणिकपणे महामंडळाची सेवा बजावत आहेत. सदर रोजदारी कर्मचारी यांना शासनाकडे नियमितपणे कायम करण्यासाठी पाठपुरावा सुरु असून यापूर्वीच्या मा. मंत्री व राज्यमंत्री महोदयांकडे बैठका देखील संपन्न झालेल्या आहेत. तरी यासंदर्भात सदर महामंडळात वर्ग-३ व वर्ग-४ ची नवीन पदे निर्माण करून सदर पदांना शासनाची मान्यता देण्यात यावी, तसेच रिक्त पदे व नव्याने निर्माण केलेल्या पदांची बिंदुनामावली प्रमाणिक करण्यात येऊन बिंदुनामावलीनुसार व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास महामंडळास अनुभवी कर्मचारी उपलब्ध होतील. त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी भारतीय कामगार संघटना शाखा वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.