अशोक चव्हाण भाजपात गेल्याने संतापची लाट !

त्यामुळे जनतेची मला साथ : वसंत चव्हाण 

0

नांदेड, लोकशाही न्युज नेटवर्क 

अशोक चव्हाण हे भाजपात गेल्याने जनतेत संतापाची लाट आहे. जनतेने त्यांना साथ न देता मला साथ दिली. अशोक चव्हाण यांच्या पक्ष बदलाचा मला फायदा झाला आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीत एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार आहे, असा दावा नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी केला आहे.

अशोक चव्हाण हे भाजपात जाणार अशी मागील दोन वर्षांपासून चर्चा होती. अखेर चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला आणि चर्चेंना पूर्णविराम दिला. त्यांच्या पक्ष बदलामुळे नांदेडच्या जनतेमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळाली. नांदेडच्या जनेतेने चव्हाण कुटुंबियांना 50 ते 60 वर्ष साथ दिली. अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षात असताना, त्यांच्या नेतृत्वात अनेक निवडणुका झाल्या. सर्व निवडणुका काँग्रेसच्या बाजूने होत होत्या, मात्र त्यांनी अचानक पक्ष सोडून गेल्याचे लोकांना पटले नाही. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि ही संतापाची लाट लोकसभा निवडणुकीत माझ्या पाठीशी राहिली, असे चव्हाण म्हणाले.

लाखाच्या फरकाने निवडून येईल

वैयक्तिक टीका आणि आरोपांवरून देखील वसंत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. अशोक चव्हाण म्हणाले की, संसदेत प्रश्न विचारण्यासाठी इंग्रजी यावी लागते. पण त्यांनी नुकतीच शपथ घेताना मराठीत घेतली. त्यांचे सध्याचे खासदार चिखलीकर देखील संसदेत हिंदीमध्ये प्रश्न विचारतात, त्यांचे काय? असा प्रश्न चव्हाण यांनी केला. नांदेडच्या जनता एकगठ्ठा माझ्या पाठीशी राहिली, तेव्हा मी लोकसभा निवडणुकीत 1 लाखाच्या फरकाने निवडून येईल, असा दावा वसंत चव्हाण यांनी केला.

म्हणून मोदी-शहा-गडकरींच्या सभा

नांदेडची जागा भाजपसाठी पोषक नव्हती म्हणून भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभा घ्यावी लागली पण नांदेडची जागा काँग्रेसच खेचून घेणार, असा विश्वास वसंत चव्हाण यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.