आसाममध्ये मुसळधार पाऊस, लखीमपूरमध्ये पूरस्थिती

0

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क
आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सखल भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे लखीमपूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे.

आसाममध्ये पूरस्थिती कायम आहे. एकट्या लखीमपूर जिल्ह्यात 1215 मुलांसह 23,516 जण बाधित झाले आहेत. यासोबतच कोंबड्यांसह एकूण 6 हजार 307 जनावरांनाही पुराचा फटका बसला आहे.आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील संततधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. लखीमपूर, धेमाजी, कामरूप, दिब्रुगढ, कचर, नलबारी आणि इतरांसह 10 महसूल मंडळांतर्गतील 25 गावे आणि इतर भाग जलमय झाले आहेत.
येथील प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले होते की, बंगालच्या उपसागारतून येणाऱ्या कमी-पातळीच्या दक्षिण आमि नैऋत्य वाऱ्यांमुळे ओलावा कायम राहील. यामुळे 15 जूनपर्यंत संततधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.