जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले

0

जळगाव ;– शहरातील एका भागातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारासउघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान पीडित मुलगी घरी नसल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिची कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर सायंकाळी ५ वाजता नातेवाईकांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.