बाल कल्याण समीतीच्या सतर्कतेने मेळघाटातील शेतात होणारा बालविवाह वेळीच हाणून पाडला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती ; बालविवाह थांबवण्याबाबत शासनाकडून बऱ्याच प्रमाणात जनजागृती व उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अजूनही जिल्हाभरात मुलींचे अठरा वर्षा पेक्षा कमी वयात लग्न करण्याचे प्रकार सुरूच आहेत . असाच एका बालविवाहाचा प्रयत्न फसल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मडकी गावात समोर आला .

चिखलदरा तालुक्यातील मडकी गावातील मुलीचा विवाह परतवाडा येथील एका शेतात 17 मार्च रोजी दुपारी चार वाजता संपन्न होणार होता. शेतात विवाह मंडप सजवण्यात आला होता . वर्‍हाडी पाहुणे मंडळी सुद्धा आली होती . नवरी नवरदेव नटले होते .

भोजनाचा सुगंध मंडपात दरवळत होता. सर्व वर्‍हाडी आनंदाने लग्न घटीकेची वाट पाहत होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना . लग्न लागण्याची वेळ जवळ आली असताना परतवाडा पोलीस स्टेशनला अमरावती येथील बाल संरक्षण अधिकारी यांनी तक्रार केली की परतवाडा येथील एका शेतात होणाऱ्या विवाहातील वधू ही 14 वर्षे वयाचीच आहे.

तेव्हा हा विवाह थांबवावा. यावर लगेच अंमलबजावणी करत परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अमरावती येथील समुपदेशक आकाश बरवट  शेतात पोचले अन हा विवाह तुम्हाला कायद्याने करता येणार नाही .असे वधूपिता- वरपित्यासह  सर्वच वर्‍हाडी मंडळींना ठणकावून सांगितले.

त्यानंतर विवाह थांबविल्या गेला. व समुपदेशक आकाश बरवट यांनी नवरी मुलीला घेऊन अमरावती येथे आणले व त्या ठिकाणी बालकल्याण  समितीसमोर हजर केले . मात्र विवाह रद्द झाल्याचे पाहून दोन्ही पक्षाकडील मंडळीच्या पदरी निराशा पडल्याने . त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व वराकडील मंडळींना आल्यापावली तसेच परत जावे लागले .

Leave A Reply

Your email address will not be published.