मालपूर शिवारात पूर्ववैमनस्यातून पा खून

0

अमळनेर : तालुक्यातील मालपूर येथील प्रभाकर विनायक पाटील यांचा शेतशिवारात खून झाल्याची घटना १९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे

प्रभाकर विनायक पाटील यांचा मृतदेह शेतात ८ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. त्यांच्या अंगावर लाठ्या-काठ्यांचे व्रण उमटल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, मुकेश साळुंखे यांनी भेट देत परिसराची पाहणी केली. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती असून मयताच्या मुलाने काही जणांची नावे सांगितली आहेत. मात्र, या संदर्भात पोलीस सर्व बाजुंनी सखोल चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.