अमळनेर क्रीडा संकुलासाठी ५० लाखाचा निधी मंजूर…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.गिरीश महाजन यांनी नुकतेच राज्यातील क्रीडा संकुलांसाठी भरघोस अनुदान घोषित केले आहे. त्यात अमळनेर येथील क्रीडा संकुलास ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.स्मिता वाघ व भैरवी वाघ-पलांडे यांनी निधी मिळण्यासाठी मंत्री महाजन यांच्याकडे मागणी केली होती. निधी मंजूर झाल्याने या मागणीस यश आले आहे.

अमळनेर क्रीडा संकुलासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. याबाबत क्रीडा प्रेमींनी मा.आ.वाघ यांच्याकडे निधीसाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. त्यानुसार ना.महाजन हे अमळनेर येथे पक्षाच्या कार्यक्रमास आले असता भाजयुमोच्या प्रदेश सचिव सौ.भैरवी वाघ-पलांडे यांनी क्रीडा संकुलाची सद्यस्थिती व निधीची आवश्यकता याबाबत मंत्री महाजन यांच्याशी चर्चा केली व निधी मिळण्याची मागणी केली होती.

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी मी देखील क्रीडापटू आहे. खेळाडूंसाठी मैदान व इतर आवश्यक सुविधा मिळाल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल असे सांगितले व निधी देण्याबाबत सकारात्मकता दाखवली. युवक व खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करून राज्यातील क्रीडा संकुलांसाठी खुप मोठ्या प्रमाणावर अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात अमळनेर क्रीडा संकुलाचा समावेश झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निधी मंजूर झाल्याबद्दल क्रीडा मंत्री ना.गिरीश महाजन व राज्य शासनाचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.स्मिता वाघ, भाजयुमो प्रदेश सचिव सौ.भैरवी वाघ-पलांडे व भाजपा पदाधिकारी यांनी आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.