पंढरपूर यात्रेसाठी जादा बस रवाना

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

आगारातून आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरसाठी जादा बस सुविधा सुरू करण्यात आल्या आहे. सदर बस रवाना होते वेळी सेवानिवृत्त उप महाव्यवस्थापक रा प मुंबई एम बी देवधर, सेवानिवृत्त कर्मचारी वानखेडे, आगार प्रमुख आय टी पठाण, वाहतूक निरीक्षक अनिकेत न्हायदे, प्रमोद बाविस्कर, एल टी पाटील, शशी पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. सदर बस ही दररोज सकाळी आठ वाजता अमळनेर येथून निघेल व पंढरपूर येथून देखील सकाळी आठ वाजता निघेल. तरी भाविकांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा. महिला भाविकांना सवलतीच्या दरात 340 रू तर पुरुष भाविकांना 680 रू. तसेच 75 वर्षांवरील नागरिकांना या बस मध्ये मोफत प्रवास करता येईल तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक पठाण यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.