8 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले भारतीय हवाई दलाचे विमान सापडले…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

बंगालच्या उपसागरात 8 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले भारतीय हवाई दलाचे विमान AN-32 सापडले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न आणि तंत्र वापरून विमानाचे अवशेष शोधून काढले आहे. विमानाचे अवशेष समुद्रात 3400 मीटर खोलवर सापडले आहे.

22 जुलै 2016 रोजी विमान बेपत्ता झाले होते

22 जुलै 2016 रोजी भारतीय हवाई दलाचे हे विमान ऑपरेशनल मिशन दरम्यान बेपत्ता झाले होते. विमानात एकूण २९ जण होते. हे विमान अचानक गायब झाले. समुद्रात प्रदीर्घ शोध मोहिमेनंतरही विमानाबाबत काहीही सापडू शकले नाही. आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी विमानाचे अवशेष शोधून काढले आहे.

उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या एयूव्हीने शोधून काढले अवशेष…

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी AN-32 विमान बेपत्ता झाल्याच्या ठिकाणी खोल समुद्रात ऑटोनोमस अंडरवॉटर व्हेईकल (AUV) तैनात केले. हे विशेष तांत्रिक क्षमतांनी सुसज्ज वाहन आहे. मल्टी बीम सोनार, सिंथेटिक अपर्चर सोनार आणि हाई रिझोल्यूशन फोटोग्राफीसह अनेक पेलोडचा वापर करून, क्रॅश झालेल्या विमानाचे अवशेष समुद्राखाली 3400 मीटर खोलीवर सापडले.

चेन्नईच्या किनाऱ्यापासून सुमारे 310 किमी अंतरावर मलबा सापडला आहे

बंगालच्या उपसागरात ज्या ठिकाणी मलबा सापडला ते ठिकाण चेन्नईच्या किनाऱ्यापासून सुमारे 310 किमी अंतरावर आहे. सर्व विश्लेषणानंतर असे आढळून आले की हा ढिगारा अपघातग्रस्त विमान AN-32 चा आहे. कारण त्या भागात दुसरे कोणतेही विमान कोसळल्याचे किंवा बेपत्ता झाल्याचे वृत्त नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.