अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप, १००० हुन अधिक लोकांचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा जमीन हादरली आहे. हेरत शहरात मध्यरात्री भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री ३.३६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हेरातपासून ३३ किलोमीटर २० मैल अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रविवारी पश्चिम अफगाणिस्तान मध्ये ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला अशी महती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपाचं सत्र सुरुच असून यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप
USGS ने ट्विटर एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, हेरात शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर स्थानिक वेळेनुसार 3.36 मिनिटांनी भूकंप झाला.त्यानंतर त्यांनी अजून एक ट्विट करत सांगितले की, अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ५.५ तीव्रतेचा आफ्टरशॉक बसला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिली आहे.

अनेक गावं उदध्वस्त, १००० हून अधिक मृत्यू
७ ऑक्टोबरला हेरातच्या याच भागात ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला आणि आठ शक्तिशाली आफ्टरशॉक्सही बसले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, घरे कोसळली असून अनेक गावं जमीनदोस्त झाली आहे. भूकंपामुळे १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालून बचावलेले हजारो घाबरलेले रहिवासी आश्रय निवाऱ्यात आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.