‘आदिपुरुष’ ला घेऊन दिग्दर्शक ओम राऊतच मोठे वक्तव्य

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

‘आदीपुरुष’ (Adipurush )हा चित्रपट वादात सापडल्यानंतर त्याची रिलीज डेट पुढे करण्यात आली होती. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या बिग बजेट चित्रपटातील व्हीएफएक्सवर प्रेक्षकांनी जोरदार टीका केली होती. आणि चित्रपटात अपेक्षित बदल करण्याचा निर्णय घेतला. आता या बदलांबाबत दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) प्रतिक्रिया दिली आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केल्याचं त्याने सांगितलं.

“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाला. त्यासोबतच या चित्रपटाची टी-सिरीज केली आहे. त्यावर भूषण कुमार यांनी आपले मत मांडले आहे.

काय म्हणाले भूषण कुमार

टी-सीरिजचे (T-series) निर्माते भूषण कुमार (Bhushan Kumar) चित्रपटाविषयी म्हणाले, “सुरुवातीला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद नेहमीच पुढे जाऊन कामी येतो. आम्ही थोडे निराश झालो होतो. पण आम्ही पुन्हा चित्रपटावर मेहनत घेतली. घडलेल्या गोष्टींमधून आम्ही शिकलो आणि त्यातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी सुचवलेल्या गोष्टींनुसार आम्ही काही बदल केले. आता आम्ही जो चित्रपट बनवला आहे, त्यावर खूप खुश आहोत.”

Leave A Reply

Your email address will not be published.