धक्कादायक; सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कारणे रिक्षाला उडवल्याची भीषण घटना घडली आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या या अपघातात कारने पाठीमागून रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत. सोरतापवाडी फाटा परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे. भानुदास गोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर सुनीता जगताप आणि इंदू जगताप असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. याशिवाय विष्णू राजाराम अंधारे आणि छाया अंधारे (दोघेही रा. सोरतापवाडी, ता. हवेली) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसरवरून उरुळी कांचनच्या दिशेने रिक्षा जात होती. पाऊणे बारा वाजेच्या सुमारास ही रिक्षा सोरतापवाडीतून उरुळी कांचनच्या दिशेने निघाली असताना अचानक पाठीमागून कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षात बसलेले प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींना उपचारासाठी उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.