चौघा अज्ञातांनी केली दोघांना बेदम मारहाण

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

कारण नसतांना चार अनोळखी तरूणांनी लाकडी दांडा, लोखंडी सळई आणि दगडाने मारहाण करून दुखापत केल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील बाजार पट्ट्यात घडली . याप्रकरणी शनिवारी ११ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची माहिती अशी कि, सुनिल गणपत दोडे (वय-४३) रा. चंदूआण्णा नगर, जळगाव हे शुक्रवारी १० मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र संजय पाटील यांच्यासोबत बोलत उभे होते. त्यावेळी चार अनोळखी तरूण त्यांच्याजवळ येवून काहीही कारण नसतांना लाकडी दांडा, लोखंडी सळई आणि दगडचा वापर करून दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सुनिल दोडे यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रारदिल्यावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक कालसिंग बारेला तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here