खासदार ब्रजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने दुचाकीस्वारांना चिरडले, 2 ठार, 1 गंभीर…

0

 

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील विद्यमान खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दोन दुचाकीस्वारांना चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करण भूषण यांचा ताफा गोंडा येथील कर्नलगंज-हुजूरपूर रस्त्यावरून जात होता. ताफ्यातील एका फॉर्च्युनर कारने दुचाकीला धडक दिली. कर्नलगंज कोतवाली परिसरातील छाताई पूर्वा जवळ हा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचे तुकडे झाले.
ओव्हरटेक करताना अपघात
यावेळी भाजपने ब्रजभूषण शरण सिंह यांचे तिकीट रद्द करून त्यांचे पुत्र करण सिंह यांना कैसरगंजमधून उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी करण सिंह आपल्या ताफ्यासह हुजूरपूरला जात होते. दरम्यान, त्यांच्या ताफ्याच्या फॉर्च्युनर कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकीस्वारांना चिरडले.
खासदार मुलाच्या ताफ्याने 2 चिरडले
या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. शेजारी बसलेली महिला गंभीर जखमी झाली. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हा अपघात किती भीषण होता, हे गाडीचे चक्काचूर झालेले भाग पाहूनच कळू शकते. अपघातानंतर धडकलेली कार पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली. अपघात झाला त्यावेळी करण सिंह यांचा ताफा हुजूरपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी रस्ता ओलांडणाऱ्या मुलांना त्यांच्या ताफ्याच्या कारने चिरडले.

Leave A Reply

Your email address will not be published.