अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार

0

पाचोरा:-तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन घटनास्थळावरून अज्ञात वाहन पसार झाले आहे.

पाचोरा ते भडगाव रोडवर असलेल्या अंतुर्ली फाट्याजवळ पाचोऱ्याहुन भडगावच्या दिशेने मोटरसायकल क्रं. एम. एच. ४१ बी. बी. ०४५१ वरुन जाणाऱ्या यशवंत भगवान माळी (वय – २३) रा. मांदुर्णे ता. चाळीसगाव यांना भडगाव हुन पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत यशवंत माळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवुन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धडक देणारे अज्ञात वाहन अंतुर्ली गावाच्या दिशेने पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून यशवंत माळी यांचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यशवंत माळी हे खाजगी फायनान्स कंपनीत वसुली कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाने मांदुर्णे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत. मयत यशवंत माळी हे अविवाहित असुन त्याचे पाश्चात्य आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.