क्रोध रूपी आग स्वतःला व इतरांना ही जाळते.

0

 

प्रवचन सारांश 24/09/2022

 

क्रोध रूपी आग मुळे मानव जीवनात खूप नुकसान करून घेतो. क्रोधामुळे स्वतः व इतरांना देखील जाळतो असा संदेश पू. जयेंद्रमुनी यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून दिला.

 

क्रोध, लोभ, मान आणि माया या चार कशायमुळे आत्मा भटकत असतो. क्रोधाला आगची उपमा दिली आहे. आग स्वतः जळते व दुसऱ्यांना ही जाळते. क्रोधात काय बोलतो, कसे वागतो याचे भान राहत नाही. या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी एक रूपक कथा सांगितली. राजाच्या दरबारात बुद्धीवान असतात त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक परदेशी येतो. नकली व असली हिरा ओळखा असे सांगितले व शर्त ही सांगितली की तुम्ही हरले तर तुम्ही एक करोड द्यावे लागतील व जिंकले तर एक करोडचा हिरा मी देईल असे ठरले. राजसभेत अंध व्यक्ती म्हणाला की मी ओळखुन दाखवतो तुम्ही विश्वास ठेवा. अंध व्यक्तीने दोन्ही हिरे घेतले.  15 मिनिटे उन्हात ठेवले! असली हिरा  हा थंडा व नकली हिरा गरम झाला.  तप्त वातावरणात देखील खरा हिरा हा थंड राहतो व नकली हिरा मात्र गरम होतो. क्रोध असलेली व्यक्ती तापत असते ती व्यक्ती म्हणजे नकली हिरा असे मार्मिकपणे त्यांनी प्रवचनात सांगितले. थंड हिरा हा खरा हिरा असतो म्हणून आपण त्याला ओळखले असे त्या अंध व्यक्तीने राजसभेत सांगितले. असे  म्हणतात की आग, वाघ, नाग यांच्यापासून दूर रहावे कारण ते खतरनाक असतात. वास्तविक पाहता क्रोध रूपी आग सद्गुण, प्रेम व संबंध नष्ट करत असते  असे पू. जयेंद्रमुनी यांनी आजच्या प्रवचनात सांगितले.

क्रोधी व्यक्ती प्रसन्नता, प्रेम, पुण्य व परमात्मापासून  दूर असतो.  क्रोधी व्यक्ती क्रोध करून चार प्रकारचे नुकसान करून बसतो. क्रोधामुळे स्वतःचे तर नुकसान होते परंतु त्याच्या जवळ असलेल्यांचेही नुकसान होते. जीवनात घमेंड, अहंकार करू नये. आपण काहीही नसतो. जोवर आपला श्वास चालतो तोवर आपले अस्तित्व असते. श्वास संपले की नाव देखील निघून जाते, तिला डेड बॉडी म्हटले जाते. जोवर श्वास आहेत तोवर आपले अस्तित्व असते हे कायम स्वरुपी ध्यानात ठेवा त्यामुळे आपण साधे सरळ जीवन जगा असा संदेश प्रवचनात दिला. त्यासाठी एक रंजक अशी गोष्ट त्यांनी सांगितली. राजा व त्याचे नोकर एकदा जंगलात जातात. राजासाठी नवा घोडा आणलेला असतो. त्याचा स्वभाव कसा हे राजाला ठाऊक नाही परंतु राजा त्यावर स्वार झाला व लगाम खेचली. लगाम खेचल्यावर घोडा सैरभैर झाला अनियंत्रीत झाला. जितकी लगाम खेचली जायची तितका घोडा जोरात पळायचा. परंतु घनदाट जंगलात राजाची लगाम ढिली झाली व तो घोडा थांबला. राजाचे सैनिक, शिपाई देखील मागे राहिले होते.  राजा जंगल भटकला. त्याला तहान लागते. सभोवती त्याला कुठेही पाणी दिसत नाही परंतु एका झाडाजवळ राजाला थेंब थेंब पाणी पडताना दिसले. गरजवंत गरज किंवा तहान भागविण्यासाठी काय नाही करत. राजाने झाडाच्या पानांचे द्रोण बनवून थेंब थेंब पाणी त्यात गोळा केले. तासाभरात जमा झालेले पाणी पिणार तोच एक पक्षी झडप घालून त्या द्रोणचे पाणी पाडून टाकतो. असे एक दोन वेळा नव्हे तर तीन वेळा झाले. राजाला त्या पक्षाचा प्रचंड राग येतो. आपण तहानेने व्याकुळ होत आहोत आणि हा पक्षी आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवतो. त्या राजाने क्रोधावेशात येऊन पक्षावर तीरकमानचा निशाना साधला व क्षणात त्याला मारुन टाकले. तोवर राजाचे सैनिक थंडगार पाणी राजासाठी घेऊन येतात. थंड पाणी प्यायल्यावर राजाचे डोके थंड होते. पाण्याचे थेंब कसे पडतात हे जाणण्यासाठी राजा झाडावर बघतो तर एका भल्या मोठ्या मेलेल्या सापाच्या तोंडातून ते पाणी टपकत होते. राजाला समजले की तो पक्षी तर आपला जीव वाचविण्यासाठी असे करत होता.  राजाने अविचाराने क्रोधाने त्या पक्षाला मारून टाकले. क्रोधामुळे माणूस विचार करण्याची शक्ती घालवतो व सत्य परिस्थिती समोर आल्यावर पश्चातापाची वेळ येते त्यामुळे आपण क्रोधापासून दूर रहावे असे आवाहन प्रवचनातून करण्यात आले. स्वाध्यायभवनात जरागच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा., डॉ. पदमचंद्र मुनी यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. रविवारी 25 सप्टेंबर रोजी अनुप्पेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी यांचे विशेष प्रवचन होणार आहे.

 

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

 

Leave A Reply

Your email address will not be published.