चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी नितीन कापडणीस

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : मालेगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर कार्यरत असलेले कर्तव्य दक्ष अधिकारीओळख असलेले नितीन  कापडणीस यांची चाळीसगाव नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आता अधिकृत स्वरुपी मुख्याधिकारी चाळीसगाव  नगरपालीकेला लाभल्यामुळे  सर्व कामे वेळच्या वेळी होतील कारण चाळीसगाव नगर पालीकेला गेल्या काही वर्षां पासून ग्रहण लागले होते कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने  महत्वाचे काम वेळच्या वेळी होत नव्हती.

तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदली नंतर मुख्याधिकारी पद रिक्तच होते प्रभारी अधिकारी म्हणून भडगावचे विकास नवाळे साहेब यांचे कडे चार्ज  असल्याने भडगाव चे कामकाज सांभाळून चाळीसगाव दोन दिवस देतअसत आता अधिकृत एक  कर्तव्य दक्ष अधिकारी मिळाल्याने शहरवासीयांनमध्ये  तसेच नगर सेवकांनमध्ये आनंदी वातावरण दिसून आले कर्मचारी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे मुख्याधिकारी नितीन रामचंद्र कापडणीस यांची संपूर्ण राज्यात कर्तव्य दक्ष प्रशासकीयअधिकारी म्हणून ओळख आहे  त्यांनी दिनांक ४ मे २१ मंगळवारी रोजी ‌चाळीसगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला त्या वेळी  नगराध्यक्षा सौ आशाताई विश्वास चव्हाण,नगर सेवक दिपक पाटील राजेंद्र चौधरी, सुर्यकांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले त्या प्रसंगी नगर पालिका सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.