मराठा समाज 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार

0

मुंबई  | सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीड येथे मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत 16 मे पासून मोर्चा काढण्याबाबत निर्णय झाला असून बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चा मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार आहे.

दरम्यान यावेळी विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील, असा इशारा विनायक मेटे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर दिला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.