कर्मयोध्दा राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवासनिमित्त 1 मे रोजी विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन

0

खामगांव (प्रतिनिधी) : दरवर्शीप्रमाणे याहीवर्शी कर्मयोध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दि.1 मे 2021 रोजी विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज सभागृह येथे महारक्तदान शिबीर, सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप,अपंग बांधवांना तीन चाकी सायकल,गरजूंना धान्य किट वाटप व महिला भगिणींना साडीचे वितरण व गौरक्षण मधील गायींना ढेपचे वाटप इत्यादी विधायक कार्यक्रमांचा समावेश आहे.

शनिवार दि. १ मे 2021 रोजी सर्वप्रथम सकाळी 7 वाजता हिंदूसूर्य राणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पुजन, सकाळी 8 वाजता संत तुकाराम महाराज सभागृह येथे भव्य रक्तदान शिबीर , रुग्णांना फळवाटप, अपंग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप,गरजूंना धान्य किट वाटप व महिला भगिणींना साडी वाटप करुन गौरक्षण येथील गायींना ढेपचे वितरण करण्यात येणार आहे. कोरोना काळात शासनाने नेमुन दिलेले सर्व नियम व सुचनांचे पालन करत हे विविध विधायक कार्यक्रम पार पडणार आहे.

कोरोना संकटांचा काळ लक्षात घेता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यावर प्रेम करणाया सर्व कार्यकर्ता व चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त सानंदा साहेबांचे अभिष्टचितन करण्याकरीता   हार  शाल, पुष्पगुच्छ घेउन कृपया येवु नये व कोरोना महामारीच्या कठीण काळात रक्तदान करावे, रक्तदान करणे हयाच सानंदा साहेबांना आपल्या अनमोल शुभेच्छा ठरतील म्हणून दिलेल्या वेळेवरच रक्तदात्यांनी मास्क लावुन सहा फुटांचे अंतर ठेउन गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून शिस्तीचे पालन करावे असे आवाहन सानंदा मित्र मंडळ व खामगांव शहर व तालुका काॅंग्रेस कमिटी व शेगांव  तालुका काॅंग्रेस कमिटी, काॅंग्रेसच्या विविध संघटना सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.