पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महाग, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

0

मुंबई : अमेरिका, युरोप आणि भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. भारतात मागील आठवडाभरापासून दैनंदिन रुग्णसंख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परिणामी इंधन मागणीला फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी इंधन दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग अकराव्या दिवशी देशातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे.

कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.