कोरोनाच्या काळातही सकल जैन समाजने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर

0

चाळीसगांव: महावीर जयंतीच्या निमित्ताने कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही सकल जैन समाजने सरकारचे शासकीय नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले अन् यशस्वीरित्या संपन्न झाले…

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने जैन समाजाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जैन समाजातील 79 पेक्षा जास्त युवकांनी रक्तदान केले.  रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून चाळीसगावात रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चाळीसगांव शहरातील जैन समाजने आजवर अनेकदा वेळोवेळी अन्नदान, चारा छावणी, हिवाळ्यात ब्लँकेट वाटप, तीन हजार गाईचे दोन महिने संगोपन, 1500 किराणा किट दुष्काळात वाटप, मागील वर्षी कोरोना काळात जेवणाचे मोफत डबे वाटप,  असे वेगवेगळे उपक्रम घेऊन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

कार्यक्रमात मनोज सोलंकी, संदीप जैन, हरेश जैन, प्रमोद गुळेचा, प्रितेश कटारिया, इंजि. निलेश कांकरिया, सुशील सोलंकी, पवन चोपडा, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.