महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज कुंभमेळ्यासाठी हरिद्वारला झाले रवाना

0

फैजपूर प्रतिनिधी |  कुंभमेळ्याच्या हरिद्वार येथील महा पर्वाला सुरुवात होत असून त्यात सहभागी होण्यासाठी येथील महामंडलेश्वर जनार्दन महाराज सोमवारी दुपारी हरिद्वारकडे रवाना झाले. ते ३० एप्रिल रोजी परत येणार असून त्या ठिकाणी शाही स्नानासह श्रीमद भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कुंभमेळा महापर्वास ९ एप्रिलपासून हरिद्वारला सुरुवात होत असून १० रोजी धर्म ध्वजारोहण व जगत गुरु सत्पंथाचार्य ज्ञानेश्वर दास महाराज यांचे सर्व १३ अखाड्याद्वारा स्वागत समारंभ रात्री १० ते १२, १२ व १४ एप्रिल रोजी शाही स्नान होईल. २० ते २६ एप्रिलदरम्यान दुपारी १ ते ४ या वेळेत श्रीमद् भागवत व गोपी गीत कथेचे आयोजन स्वामी जगन्नाथ धाम , भीम गोडा हरिद्वार याठिकाणी वैदिक सनातन संत पंथ प्रेरणा पीठ, पिराणा यांनी आयोजन केले असून कथेचे निरुपण महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे.

कथा श्रवण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . २६ रोजी महंत जयरामदास महाराज निष्कलंकी धाम, नखत्राना कच्छ व आचार्य दिव्यानंदजी महाराज, अथर्वेदिय संत पंथ सेवा आश्रम गादिया कच्छ यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक समारंभ व २८ रोजी पुन्हा शाही स्नान होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन वैदिक सनातन संत पंथ तीर्थधाम प्रेरणा पीठ पिराणा, समस्त ट्रस्टी व अखिल भारतीय संत पंथ परिवार, स्वामी जगन्नाथ धाम हरिद्वार ट्रस्टी सेवक महंत अरुण दास महाराज , हरिद्वार येथील श्रीकृष्ण हरिधाम ट्रस्टचे महंत प्रेमानंद आदी संत महंतांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.