पारोळा येथे तीन लाख रूपयाचे कॅरिबॅग जप्त ; न.पा.ची धडक कारवाई

0

 पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे नगर पालिके च्या वतीने दुपारच्या सुमारास कॅरि बॅग विक्रेत्यांच्या घरी व गोडाऊन मध्ये  अचानक धाड टाकुन टाकण्यात आली.

या धाडीत तीन लाख रूपये किंमती चे जवळ पास चार टन सिंगल युज प्लाॅस्टिक कॅरि बॅग जप्त करण्यात आली, तसेच कारवाई करत चाळीस हजाराचा दंड ही वसुल करण्यात आला, यामुळे शहरात कॅरिबॅग विक्रेत्या मध्ये घबराटी चे वातावरण निर्माण झाले आहे, शहरातील प्रमुख कॅरिबॅग विक्रेते अतुल वाणी,रविंद्र वाणी, तसेच अतुल प्रोव्हीजन यांचा वर कारवाई करण्यात आली.

या आधी ही शहरात सिंगल युज प्लास्टिक विरोधात कारवाया झाल्या आहेत परंतु ऐवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथम वेळेस कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे,या पुढे ही कारवाई मध्ये सातत्य राहाणार असल्याची माहिती पारोळा नगर पालिकेच्या मुख्यधिकारी ज्योती भगत यांनी सांगितले,सदर पथकात कर निरिक्षक संदिप सांळुखे,अभिषेक काकडे,संदिप सानप,एच,एम,पाटील,अक्षय हटकर ,टि,डी,नरवाडे,आकाश चौधरी,अभिजित मुदांणकर,सचिन चौधरी यांच्या सह न,पा,चे इतर कर्मचारी सदर पथकात होते,.

Leave A Reply

Your email address will not be published.