काय सांगताय ! ‘या’ श्रीमंत देशात केवळ 83 रुपयांत घरं विकतय सरकार

0

आजकाल लोक एक-एक पैसा जोडून आपल्या स्वप्नातील घर खरेदी करतात अथवा बांधतात. मात्र, एका देशात सरकार केवळ 83 रुपयांत घरं विकत आहे. हो… हे खरं आहे! इटलीमध्ये (Italy) केवळ 83 रुपये देऊन हजारो परदेशी नागरिकांनी घरं (Home) खरेदी केली आहेत. मात्र, स्थानिक लोक याला विरोध करत आहेत. स्थानिक प्रशासन आपली घरं विकत आहे, असा या नागरिकांचा आरोप आहे. ही घरं इटलीतील सिसली (sicily) आयलॅन्डवर विकली जात आहेत. 14 व्या शतकात वसलेल्या या गावाचे रुपांतर आता अर्बन जंगलात झाले आहे.

येथील अधिकांश घरे मोडकळीस आली आहेत. यामुळेच येथील लोक गाव सोडून शहरांत गेले आहेत. यामुळे येथील घरं रिकामी झाली. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन ही घरं विकत आहे.

घरं विकण्याला स्थानिक लोक विरोध करत आहेत. यावर बोलताना, सिसलीचे महापौर म्हणाले, की त्यांनी या गावातील लोकसंख्या वाढविण्याचा निश्चय केला आहे. यामुळेच येथे केवळ 83 रुपयांत घर विकायला सुरुवात करण्यात आली आहे.

मात्र, यानंतर येथील महापौरांना आपल्या योजनेसंदर्भात लोकांच्या रोशालाही सामोरे जावे लागले आहे. गाव सोडून गेलेल्या लोकांनी या योजनेला विरोध केला आहे. एवढेच नाही, तर गाव आमचे, घर आमचे, मग ते विकणारे प्रशासन कोन? असा सवालही येथील स्थानिकांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.