कार्यवाहीसाठी आणलेले गौण खनिजाचे ट्रॅक्टर, पोलीस ग्राउंड वरून पसार

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : विनापरवाना अवैद्य बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचे पकडलेले ट्रॅक्टर तलाठ्याने कारवाईसाठी पोलीस ग्राउंड वर लावले असता, पोलीस ग्राउंड वर जप्त केलेले ट्रॅक्टर गौण खनिजा सह पसार झाल्याची खळबळ जनक घटना चाळीसगाव शहरात घडली.

याबाबत माहिती अशी की दिनांक 21 फेब्रुवारी च्या दुपारी तलाठी विनोद कृष्णराव मेन, यांनी शहरातील आदर्श नगर भागात मुरमाची वाहतूक करणारे विना नंबर चे ट्रॅक्टर पकडल्यानंतर या ट्रॅक्टर व त्यामधील भरलेल्या मुरमाची चौकशी केली असता मरुम हा विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे आणलेला असल्याचे खात्री झाल्यावर तलाठी मेन यांनी ट्रॅक्टर गौण खनिज शहरातील पोलीस ग्राउंड वर आणून लावला.

 

ट्रॅक्टर चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने विनोद एकनाथ भोसले राहणार खरजई तालुका चाळीसगाव तसेच मालकाचे नाव बाप्पू भावराव काळे उर्फ भावडू काळे राहणार खरजई असे सांगितले हे ट्रॅक्टर कारवाईसाठी पोलीस ग्राउंड वर उभे केले असता दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी दहा वाजता तलाठी मेन ग्राउंड वर ट्रॅक्टर पाहण्यासाठी गेले असता त्यांना ट्रॅक्टर दिसून आले नाही त्यामुळे सदर ट्रॅक्टर पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर मेन यांनी यांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेऊन सदर व ट्रॅक्टर चालक व मालक यांनी पळून नेल्याची पोलिसात तक्रार दिली या गुन्ह्याबाबत चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी तपास करीत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.