देशमुख महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त ‘शिवविचार परीक्षे’चे आयोजन

1

भडगाव (प्रतिनिधी) : येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारी ‘शिवविचार परीक्षा’ या वर्षीसुद्धा आयोजित करण्यात आली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर ही परीक्षा यावर्षी गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

 

ॲड. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर ही परीक्षा आधारित होती. या परीक्षेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे चरित्र तरूणांच्या पुढे यावे व त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सर्वसामान्य बहुजन रयतेचा राजा’ ही प्रतिमा पुढे यावी. महाराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांचे सर्वधर्मसमभावाचे विचार आजच्या पिढीला कळावे, हा या उपक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक वितरित करण्यात आले तसेच ऑनलाइन पीडीएफ फाईल पुरवण्यात आली.

 

या उपक्रमाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, संस्थेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख हे या परीक्षेचे दरवर्षी यशस्वीपणे आयोजन करतात. यावर्षी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. भालेराव यांचे त्यांना सहकार्य लाभले. या परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण ७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

1 Comment
  1. योगेश शिंपी says

    कौतुकास्पद उपक्रम सरजी..!!

Leave A Reply

Your email address will not be published.