शहीद जवान यश देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

अंत्यसंस्काराला लोटला हजारोंचा जनसागर ;

चाळीसगाव- तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आणि मराठा रेजिमेंट बटालियनचे जवान श्रीनगर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ नोव्हेंबर रोजी शहीद झाले होते . त्यांच्यावर शनिवारी २८ रोजी शासकीय इतमामात सकाळी ११: ५० वाजता मानवंदना देऊन अंतिम निरोप देण्यात आला. लहान भाऊ पंकज देशमुख यांनी यावेळी भडाग्नी दिला . हजारोंच्या जनसमुदायाने साश्रू-नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला.दरम्यान कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना १ कोटींची मदत जाहीर केली .

पिंळगाव येथील यश दिगंबर देशमुख (वय २१) हा श्रीनगर येथे तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झाला होता. त्याचे पार्थिव शुक्रवारी रात्री नाशिक येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी ९ वाजता चाळीसगाव मधील त्याच्या गावात पिंपळगाव येथे आणण्यात आले. सुरुवातीला यश देशमुख यांच्या घरी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर जवानांनी त्याच्या शरीराभोवती तिरंगा लपेटून त्याचे पार्थिव वाहनावर ठेवले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा अंत्यविधीच्या स्थळापर्यंत नेण्यात आली.

यांची होती उपस्थिती

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन त्याला मानवंदना दिली. याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, चाळीसगावचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी सभापती पोपट भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सैन्य दल व पोलीस प्रशासनातर्फे मानवंदना

शहीद जवान यश देशमुख यांच्या पार्थिव देहा सोबत आलेले १०१ मराठा रेजिमेंट चे कमांडींग आॅफीसर ,प्रशांत देशमुख,सारंग, सुभेदार रामनिवास,श्रीधर कदम यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देवून बंदूकीच्या चार फैरीची सलामी देण्यात आली

यावेळी खानदेश रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मेजर सचिन पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख कॅप्टन रविंद्र पाटील, मेजर संदीप सिरुडकर,उल्लास पाटील, विजय पाटील,सैमित्र पाटील, विठ्ठल सावंत, दत्तात्रय पाटील, भूषण पाटील, प्रदिप तेली,पगारे, योगेश पाटील, विनोद झोडगे, विजय वायकर, जयदीप पाटील, अभिमन्यू जाधव, प्रशांत पाटील, कमलेश पाटील,आदी जवान सामिल होते.

Leave A Reply

Your email address will not be published.