फणसाच्या बिया खाल्याने आरोग्याला होतात ‘हे’ फायदे? जाणून घ्या काय आहे

0

सध्या बाजारात फणस सर्वत्र मिळते. फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस खाण्याचे डॉक्टर देखील सल्ला देतात. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात.

दरम्यान, आपण आहारात फणसाचा वापर केला असल्याचे आपण ऐकलं, पण फणसाच्या बियांचा वापर हा आहारात केला जाते ते आज पहिल्यांदा ऐकण्यात आले असेल. फणस हा ठराविक भागामध्येच पाहायला मिळतो. त्याचे उत्पन्न हे कोकण भागात जास्त प्रमाणात होते. अनेकदा फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बीयाअनेकजण फेकून देतात. पण फणसाइतकेच त्याच्या बियांमध्ये पोषणद्रव्यं मुबलक असतात. त्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर असल्याने वाफवून किंवा भाजून बिया खाल्या जातात. या बिया खाण्याने असे कोणते फायदे होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात ..

आठळ्यांमध्ये स्टार्च उत्तमप्रकारचे आढळते. यामधून शरीराला उर्जा मिळते. वाटीभर वाफवलेल्या बिया खाण्याने पोट भरते.

पचनशक्ती मजबूत राहण्यासाठी बियांचा वापर केला जातो. बियांमध्ये चांगल्या दर्जाचे डाएटरी फायबर्स असते. तसेच कॅलरीज अल्प प्रमाणात असतात. त्यामुळे वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. रक्तातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी राखण्यास, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते.  बियांमधून मॅग्नीज, मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स मिळतात. या दोन्ही प्रकारच्या मिनरल्समुळे हाडांना बळकटी मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.